एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, आयुष्यभर हातात हात घेऊन सुख दुःखाना सामोरे जात जगणाऱ्या प्रत्येक जोडप्यांना माझा सलाम..!
असे जीवन साजरे करताना, माझ्या आई, मावशी, काकू chya पिढीतील स्त्रियांच्या मनातील भावना या कवितेत टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
------------
संसार हा माझा, संसार हा तुझा
दरवळ हा जसा बकुळ फुलांचा पसरतो.
तुझ्या सवे सखया ही चढण चढून आले
वळणावर सुख दुखांच्या हातात हात आहे.
जपलेस तू मला जीवापाड किती,
अव्यक्त प्रेम तुझे, क्षणो क्षणी जगते आहे.
गुंफलो आपण असे, श्वास ही एक झाला
गाण्यातल्या माझ्या, हरेक सुर तुझा झाला..
जीवन माझे अवघे तुझ्या भोवती गमते,
तृप्तता ही मला अमृतातीत लाभते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा